मध एक बहुगुणी औषध . आयुर्वेदामध्ये 'मधाला'अनन्यसाधारण महत्व आहे. मित्रांनो आरोग्यम धनसंपदा मध्ये आपले स्वागत आहे. आयुर्वेदामध्ये (honey) मधाला संपूर्ण आहाराचा दर्जा देण्यात आला आहे. कोरोना कालामध्ये मधाचा औषध म्हणून जास्त प्रमाणात घरगुती स्वरूपात केला गेला . हा एक असा स्वादिष्ट पदार्थ आहे, ज्याचा आपण डाएटमध्ये सहजरित्या समावेश करू शकतो. कित्येक जण दूध आणि मध एकत्र करून त्याचे सेवन करतात. तर काही जण पाककृतींमध्येही मधाचा समावेश करतात. चवीसोबतच मधामध्ये शरीरास उपयुक्त असणारे कित्येक पौष्टिक घटक आहेत. रोज योग्य प्रमाणात मधाचे सेवन केल्यास आरोग्याला प्रचंड फायदे मिळतात. मधाचा आयुर्वेदिक औषधांमध्येही उपयोग केला जातो. यातील पोषण तत्त्वांमुळे शरीर शुद्ध होते.झोपण्यापूर्वी मधाचे सेवन कल्यास आपल्याला झोप शांत लागते नियमितपणे मधाचे सेवन केले तर शरिरात स्फूर्ती, शक्ती आणि उर्जा येते. मधामुळे शरीर, सुंदर आणि सुडौल बनते. मध वजन घटवते आणि वाढवते देखील. मधामध्ये ए, बी, सी, व्हिटामीन कॅल्शियम, सोडियम फॉस्फोरस, असते....
Comments
Post a Comment