आपला आहार आणि आजार
असा कुठलाही आजार नाही जो आहाराच्या माध्यमातून बरा होत नाही, परंतु बऱ्याच वेळी आपणास आहारात काय घ्यावे हे माहीत असते पण ते कधी व किती प्रमाणात घ्यावे या बद्दल कल्पना नसते. आहार योग्य वेळी योग्य प्रमाणात व नियमातच घ्यावा म्हणजे खाल्लेले अन्न आपणास पोषण देईल. आयुर्वेदातील आहाराचे नियम:- नियम १ : आपल्या पोटाचे चार भाग करावेत . त्यातील दोन भाग हे घन आहारासाठी ठेवावेत , एक भाग हा द्रव आहारासाठी ठेवावा आणि उर्वरित एक भाग हा वायुभ्रमणासाठी रिकामा ठेवावा , जेणेकरून अग्नीचे प्रदीप्ती योग्य प्रकारे होते आणि आहार हा सुयोग्यरीत्या पचविला जातो . आहार हा योग्य रीतीने पचला , तरच त्यातील पोषकांश शरीराला लाभतात आणि स्वास्थ्य टिकून राहते . नियम २ : सकाळी उठल्याबरोबर अर्धा ते एक ग्लास कोमट पाण्यात एक लिंबू पिळून प्यावे . लिंबाचा रस हा थेट आपल्या पचनशक्तीवर कार्य करतो आणि जुनाट पित्त , तसेच मलबद्धता इत्यादी पचनसंस्थेशी संबंधित तक्रारी कमी करतो . नियम ३ : जेवणाआधी आर्धा ते पाऊण तास एक ग्लास पाणी प्यावे. त्यामुळे आहार हा सुयोग्य रीतीने पचविला जातो. नियम ४ : कोणतेही फळ हे जेवणाच्या अगदी अगो...