मध खाण्याचे फायदे व तोटे-honeybenefits

 

मध एक बहुगुणी औषध .

मध


 आयुर्वेदामध्ये 'मधाला'अनन्यसाधारण महत्व आहे.

मित्रांनो आरोग्यम धनसंपदा मध्ये आपले स्वागत आहे.

 आयुर्वेदामध्ये (honey)मधाला संपूर्ण आहाराचा दर्जा देण्यात आला आहे. कोरोना कालामध्ये मधाचा औषध म्हणून जास्त प्रमाणात घरगुती स्वरूपात केला गेला . हा एक असा स्वादिष्टपदार्थ आहे, ज्याचा आपण डाएटमध्ये सहजरित्या समावेश करू शकतो. कित्येक जण दूध आणि मध एकत्र करून त्याचे सेवन करतात. तर काही जण पाककृतींमध्येही मधाचा समावेश करतात. चवीसोबतच मधामध्ये शरीरास उपयुक्त असणारे  कित्येक पौष्टिक घटक आहेत.

रोज योग्य प्रमाणात मधाचे सेवन केल्यास आरोग्याला प्रचंड फायदे मिळतात. मधाचा आयुर्वेदिक औषधांमध्येही उपयोग केला जातो. यातील पोषण तत्त्वांमुळे शरीर शुद्ध होते.झोपण्यापूर्वी मधाचे सेवन कल्यास आपल्याला झोप शांत लागते  नियमितपणे मधाचे सेवन केले तर शरिरात स्फूर्ती, शक्ती आणि उर्जा येते. मधामुळे शरीर, सुंदर आणि सुडौल बनते. मध वजन घटवते आणि वाढवते देखील. मधामध्ये  ए, बी, सी, व्हिटामीन  कॅल्शियम, सोडियम फॉस्फोरस, असते. रोज मध खाल्याने शरिरात शक्ती, स्फूर्ती निर्माण करून रोगांशी लढा देण्याची शक्ती वाढवतो.कफ आणि दम्यासाठी मध खूप रामबाण उपाय आहे.रोज मध खाल्याने आरोग्य चांगले राहते आणि शरीर स्थूल होत नाही आणि मेंदूतील कमकुवतपणा दूर होतो. मधाचे सेवन केल्यावर पिंपल्स दूर करण्यात उपयोगी ठरते. तुम्ही गुलाब पाणी, लिंबू आणि मध एकत्र करून चेहऱ्यावर लावल्यास फायदा होतो. चेहऱ्या कोरडेपणा दूर करण्यासाठी मध, साय आणि बसन यांचे उटणे लावल्यास चेहरा मुलायम होतो. यामुळे चेहऱ्यात चमक येईल. रोज मध खाल्याने किडनी आणि आतडे चांगले राहतात.

    कफ आणि दमा यामुळे दूर होतो. आल्यासह मध घेतल्यास खोकल्यात आराम मिळतो. तसेच उच्च रक्तदाब म्हणजे हाय ब्लॅड प्रेशरमध्ये मध खूप उपयोगी ठरते. रक्ताला स्वच्छ करण्यासाठी मधाचा वापर केला पाहिजे. हृदय मजबूत करण्यासाठी आणि हृदय योग्य पद्धतीने कार्य करण्यासाठी आणि हृदयाच्या रोगापासून वाचण्यासाठी मध खाल्ले पाहिजे.


टीप. या लेखात दिलेली माहिती सर्वसामान्य सूचनावर आधारित आहे.आरोग्यम धनसंपदा याची पुष्टी करत नाही.याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ञाशी सम्पर्क करावा .

Comments

Popular posts from this blog

डोळ्याखाली_काळे_डाग BLACK_CIRCLES_EYES

निरोगी आरोग्याची त्रिसूत्री