डोळ्याखाली_काळे_डाग BLACK_CIRCLES_EYES

 डोळ्यांखाली_काळे_डाग व डोळयांचे रोग - उपाय 

DARK_CIRCLES

मानसिक ताण तणाव,प्रदूषित हवा , मोबाईलवापराचा आतिरेक यामुळे डोळ्या संदर्भात आजारात वाढ होताना दिसत आहे. आपण जर काळजी घेतली तर आपण डोळ्यांचे आरोग्य सुधारू शकतो.
उपाय १ 
           डोळ्याखालील काळ्या भागावर मोहरीच्या तेलाने मालिश केल्याने तसेच सुकलेले आवळे व खडीसाखर यांचे चूर्ण सम प्रमाणात १ ते ५ ग्रॅम सकाळ-संध्याकाळ पाण्याबरोबर घेतल्याने डोळ्याखालील काळे डाग नाहीसे होतात.

डोळ्यांचे इतर आजार व उपाय 

रातांधळेपणा (रात्री न दिसणे) (Night Blindness) : 
पहिला उपाय: बेलपत्राचा २० ते ५० मि.ली. रस प्यायल्याने व ३ ते ५ थेंब डोळ्यात घातल्याने रातांधळेपणात आराम मिळतो.
दुसरा उपाय : कृष्णतुळशीच्या पानांचा २-२ थेंब रस १४ दिवस डोळ्यात घातल्याने रातांधळेपणात लाभ होतो. या प्रयोगाने डोळ्यांचा पिवळेपणाही दूर होतो.
तिसरा उपाय : १ ते २ ग्रॅम खडीसाखर व जीरे २ ते ५ ग्रॅम गाईच्या तुपाबरोबर सेवन केल्याने तसेच लेंडी पिंपळी ताकात उगाळून त्याचे अंजन केल्याने रातांधळेपणात फायदा होतो.
चौथा उपाय : जीरे, आवळा व कापसाची पाने सम प्रमाणात घेऊन, वाटून डोक्यावर २१ दिवस पट्टी बांधल्याने फायदा होतो. डोळ्यांचा पिवळडेपणा : रात्री झोपताना एरंडेल तेल किंवा मध डोळ्यात घातल्याने डोळ्यांची सफेदी वाढते.

डोळे लाल होणे
पहिला उपाय : आवळ्याच्या पाण्याने डोळे धुतल्याने किंवा बुलाबजल घातल्याने फायदा होतो.
 दुसरा उपाय :
                      पेरूच्या पानांचे पोटीस बनवून (२०-२५ पाने
वाटून, वडीसारखा आकार देऊन, कापडात बांधणे) रात्री झोपताना डोळ्यावर बांधल्याने डोळ्यांची सूज व वेदना दूर होतात.
तिसराउपाय : हळकुंड तुरीच्या डाळीत उकळून, सावलीत सुकवून, पाण्यात उगाळून सूर्यास्तापूर्वी दिवसातून दोन वेळा डोळ्यात घातल्याने डोळे लाल होणे, अधिमंथ (नेत्रदाब वाढणे- Glaucoma), डोळ्यात फूल पडणे या व्याधींमध्ये लाभ होतो.

डोळ्यातील उष्णता किंवा डोळे येणे :
लिंबाचा रस व गुलाबपाणी यांचे सम प्रमाणातील मिश्रण एक- एक तासाच्या अंतराने डोळ्यात घातल्याने तसेच हलका हलका शेक करीत राहिल्याने एक दिवसातच आलेले डोळे ठीक होतात. 
                                            रांजणवाडी (Stye) :
हळद व लवंग पाण्यात उगाळून, गरम करुन किंवा हरभऱ्याची डाळ वाटून पापण्यांवर लावल्याने तीन दिवसांतच रांजणवाडी ठीक होते.

डोळ्यात कचरा गेल्यास :

पहिला उपाय: शंभर ग्रॅम पाण्यात एक लिंबाचा रस घालून
त्याने डोळे धुतल्यास डोळ्यात गेलेला कचरा निघून जातो.. दुसरा प्रयोग : डोळ्यात चूना गेल्यास तूप किंवा दह्याची निवळी(दह्यावर येणारे पाणी) डोळ्यात घालावी. 

डोळे दुखणे : उष्णतेमुळे डोळे दुखत असल्यास दुधीभोपळा किसून त्याची पट्टी बांधल्याने फायदा होतो.

डोळ्यातून पाणी येणे :

पहिला उपाय : डोळे बंद करुन पापण्यांवर लिंबाच्या पानांचा लगदा ठेवल्याने फायदा होतो. यामुळे डोळ्यांचे तेजही वाढते.

दुसराउपाय : रोज जलनेती करावी. पंधरा दिवस केवळ उकडलेले मूग खावेत. त्रिफळा गुग्गुळाच्या ३-३ गोळ्या दिवसातून तीन वेळा चावून चावून खाव्यात. तसेच रात्री झोपण्यापूर्वी त्रिफळ्याच्या तीन गोळ्या गरम पाण्याबरोबर घ्याव्यात. बोरीक पावडरीच्या पाण्याने डोळे धुवावेत. याने फायदा होतो.

मोतीबिंदू (Cataract) व अधिमंथ (नेत्रदाब वाढणे) (Glaucoma)
                         चष्मा घालविण्यासाठी :

पहिलाउपाय : सहा ते आठ महिने नियमितपणे जलनेती
केल्याने तसेच पायाचे तळवे व कानशील या ठिकाणी गाईचे तूप चोळल्याने फायदा होतो. दुसरा प्रयोग : ७ बदाम, ५ ग्रॅम खडीसाखर आणि ५ ग्रॅम बडीशेप तिन्ही एकत्र करुन, त्याचे चूर्ण बनवून रात्री झोपण्यापूर्वी दुधाबरोबर
घेतल्याने नेत्रज्योती वाढते.

टीप. ---     या लेखात दिलेली माहिती सर्वसामान्य सूचनावर आधारित आहे.आरोग्यम धनसंपदा याची पुष्टी करत नाही.याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ञाशी सम्पर्क करावा .

Comments

Popular posts from this blog

निरोगी आरोग्याची त्रिसूत्री