Posts

Showing posts from July, 2024

९०दिवसांनी बदलावा टूथब्रश

          ९०दिवसांनी बदलावा टूथब्रश  मौखिक आरोग्याकडेही काळजीपूर्वक लक्ष देणे गरजेचे असते. आपण सर्वजण आपले दात स्वच्छ करण्यासाठी नियमित टूथब्रश वापरतो; पण तोच टूथब्रश अनेक महिने वापरणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. दातांच्या संपर्कात आलेल्या टूथब्रशवर १.२ दशलक्षाहून अधिक बॅक्टेरिया असू शशकतात. 'न्यूयॉर्क स्टेट डेंटल जर्नल'च्या अहवालानुसार, ७० टक्के वापरलेले टूथब्रश या जीवाणूंनी दूषित असतात, ज्यामुळे आरोग्य समस्या किंवा बॅक्टेरियाच्या संसर्गाचा धोका असतो. टूथब्रश व्यवस्थित ठेवल्यास आणि मूलभूत स्वच्छता पाळल्यास हा धोका कमी होऊ शकतो. टूथब्रश दर तीन महिन्यांनी बदायावा; कारण त्याचे ब्रिस्टल्स खराब होऊ शकतात किंवा ब्रिस्टल्सचा आकार बदलू शकतो, टूथब्रशच्या ब्रिस्टल्समध्ये बॅक्टेरिया वाढू शकतात. जर तुम्ही टूथब्रश नियमितपणे स्वच्छ केला नाही, तर घाण त्याच्या ब्रिस्टल्समध्ये लपून राहू शकते. अशा परिस्थितीत, टूथब्रश दररोज वापरण्यापूर्वी आणि नंतर सामान्य किंवा कोमट पाण्याने पूर्णपणे धुवा.