दीर्घ_श्वासांचे_फायदे

दीर्घ श्वास घ्या आनंदी रहा.

दीर्घ श्वास

 ताण ,तनाव टेंशन घलावन्याचा रामबाण ईलाज म्हणजे दीर्घ श्वसन 

मित्रांनो आरोग्यम धनसंपदा मध्ये आपले स्वागत आहे.
मानसिक  स्थिती आणि शारीरिक स्थिती यांचा आपल्या श्वासाशी फार जवळचा संबंध असतो.श्‍वासाची गती वाढते त्यावेळी आपल्या शारीरिक मानसिक स्थिती मध्ये बदल घडतो. खेळताना, व्यायाम करताना मेहनतीचे काम करताना शरीराला ऑक्सिजन ची अधिक गरज असते अशावेळी आपण नकळतपणे खोल आणि दीर्घ श्वास घेतो यामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते.म्हणून दीर्घ श्वसन करणे गरजेचे आहे.
यामध्ये आपल्याला योग प्राणायाम करणे आवश्यक आहे.
१.कपालभाती प्राणायाम
नियमितपणे करणे आपल्यासाठी फायदेशीर आहे. हे आपल्या शरीरातून विषारी हवा काढून टाकते. कपालभाती तुमचे यकृत आणि मूत्रपिंड कार्य सुधारते. हे मनाला शांत करते. श्वास घेण्याच्या तंत्रामुळे तुमची स्मरणशक्ती आणि एकाग्रता सामर्थ्य सुधारते.
२.अनुलोम विलोम 
श्वासोच्छ्वासाच्या माध्यमातून उजव्या आणि डाव्या नाड्या शुद्ध आणि संतुलित केल्या जातात. यामुळे संधिवात आणि सायनसायटिस कमी होतो. हे अॅलर्जी आणि दमा बरा करण्यास मदत करते.
३.भ्रामरी प्राणायाम
 तणाव दूर करण्यात मदत करते. हे श्वास घेण्याच्या तांत्रिक नसांना शांत करते. हा प्राणायाम मायग्रेन कमी करण्यास मदत करतो. यामुळे राग आणि चिंता कमी होते. हे रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी आणि अल्झायमर रोगासाठी फायदेशीर आहे.

याचप्रकारे शवासन देखील मानसिक तणावांमुळे निर्माण .होणाऱ्या विकारांपासून रक्षण करण्यासाठी उपयुक्त आहे. नियमित प्राणायाम केल्याने फुप्फुसे शक्तीशाली राहतात .व मानसिक तसेच शारीरिक रोगांपासून रक्षण होते. प्राणायाम ही दीर्घ जीवन जगण्याची गुरूकिल्ली आहे. प्राणायामाबरोबर शुभ चिंतन केले गेले तर मानसिक तसेच शारीरिक दोन्ही विकारांपासून रक्षण होते व सुटकाही होते. शरीराच्या ज्या भागामध्ये वेदना, दौर्बल्य तसेच व्याधी असतील त्या भागावर ध्यान केंद्रित करुन प्राणायाम केला पाहिजे. नाकावाटे शुद्ध वायू आत घेत असताना असा विचार केला पाहिजे की, शरीरामध्ये ज्या ठिकाणी वेदना आहेत त्या ठिकाणी प्रकृतीतील स्वास्थ्यवर्धक वायू पोहोचत आहे. अर्धा मिनिट श्वास रोखून ठेवावा व वेदनायुक्त भागाचे चिंतन करीत त्या अंगाची थोडीशी हालचाल करावी. श्वास बाहेर सोडत असताना अशी भावना करावी की, 'वेदनायुक्त भागामधून दूषित हवेच्या रुपात रोग बाहेर पडत आहे व मी रोगमुक्त होत आहे. ॐ.. ॐ.. ॐ.... अशा प्रकारे नियमित अभ्यास केल्याने स्वास्थ्य प्राप्तीमध्ये खूपच सहाय्य मिळते.


टीप. या लेखात दिलेली माहिती सर्वसामान्य सूचनावर आधारित आहे.आरोग्यम धनसंपदा याची पुष्टी करत नाही.याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ञाशी सम्पर्क करावा .

Comments

Popular posts from this blog

डोळ्याखाली_काळे_डाग BLACK_CIRCLES_EYES

निरोगी आरोग्याची त्रिसूत्री