निरोगी आरोग्याची त्रिसूत्री
निरोगी आरोग्याची त्रिसूत्री
निरोगी रहाण्याची त्रिसूत्री
मित्रांनो 'आरोग्यम धनसंपदा 'मध्ये आपले स्वागत आहे.
आपण पाहतोय की दवाखान्यांची संख्या वाढत चालली आहे.पेशंटच्या संख्येत वाढ होत आहे आणि सर्वसामान्यापासून स्वस्थ कसं राहावं हे लपवलं जातय . आणि जास्तीत जास्त लोक आजच्या या परिस्थितीत स्वस्थ कस राहावे यासाठी धडपडत आहेत.यासाठी पहिल्यांदा आपल्याला आपल्या आहारावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. त्याच्यात सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण पाहिलं तर आपण काय खातो तर चपाती ,भाकरी ,भाजी ,भात ,डाळ आता आपण पालेभाज्या किती खातो आणि पालेभाज्या किती प्रमाणात खातो? तर खूपच कमी प्रमाणात आपण खातो.परिणामी आपण सर्दी खोकला या आजारांना बळी पडतो व आपली रोगप्रतिकार शक्ती कमी होत जाते परिणामी त्यातूनच मोठे आजार जन्म घेऊ लागतात. जेव्हा आपण भाज्या शिजवतो तेव्हा शिजवल्यानंतर त्याच्यातील जे पोषक तत्त्व आहेत ते नष्ट होतात त्याच्यामध्ये फक्त राहतं काय तर फायबर्स बाकीचे जे पोषक तत्त्व आहेत ती सर्व नष्ट होतात .आणि त्यामुळे मग आपण आजारी पडतो आता माणूस केव्हापासून आजारी पडायला लागला तर जेव्हापासून माणसाने प्रक्रिया केलेले पदार्थ खायला सुरुवात केली तेव्हापासूनच तो आजारी पडायला लागला याचा अर्थ असा नाही की शिजवलेल अन्न अजिबात खाऊच नये पण आपल्या आहारामध्ये कच्चे अन्नपदार्थ खाणे अतिशय आवश्यक आहे कारण आपले अन्नच एक प्रकारे औषध ठरू शकते याच्याकडे आज आपणाला लक्ष देणे गरजेचे आहे .आता जी पोषक तत्त्व आपण नष्ट करतो ती जर मिळवली तर आपण स्वस्थ राहू त्यासाठी उपाय काय तर भाज्यांचा रस काढणे व तो पिणे मग वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आपण त्यांचा रस करून पिऊ शकतो त्यामुळे त्याच्यात असणारे उपयुक्त घटक आहेत ते आपणाला मिळतील आणि आपली रोग प्रतिकारशक्ती वाढवून आपणाला स्वस्थ राहण्यास मदत करते भाजी पाल्या बरोबरच महत्वाचे आहेत ते म्हणजे फळे आणि पाणी फळे आपण भरपूर प्रमाणात खाल्ले पाहिजे आणि त्याचबरोबर पाणी सुद्धा भरपूर पिलं पाहिजे यामुळे नक्कीच आपण स्वस्थ राहण्यास मदत होईल
टीप. या लेखात दिलेली माहिती सर्वसामान्य सूचनावर आधारित आहे.आरोग्यम धनसंपदा याची पुष्टी करत नाही.याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ञाशी सम्पर्क करावा .

Comments
Post a Comment