कसा असावा आपला आहार
कसा असावा आपला आहार
आपला आहार सात्विक सर्व चवीनी युक्त सात्विक पचावयास हलका असावा .
नमस्कार मित्रानो
आज आपण 'आहार' या स्तंभाचा विचार करणार आहोत. जन्म ते मृत्यू या प्रदीर्घ प्रवासामध्ये शरीरव्यवहार सुरू राहण्यासाठी अन्नाची जरूरी आहे.ज्याप्रमाणे अग्नीला सरपण मिळाले नाही तर तो जळून जाईल तसेच शरीराला अन्न मिळाले नाही तर पोटातील अग्नी विझून जाईल. शरीराकरिता पंचमहाभूतात्मक (परंतु पृथ्वी आप महाभूत प्रधान) आहाराची आवश्यकता असते. अन्नाच्या सहा चवी(गोड, आंबट, खारट, कडू, तिखट, तुरट ) आहेत. यांनी आपला आहार परिपूर्ण असला पाहिजे. म्हणजे यंत्र व्यवस्थित काम करते तसे शरीरही सुरळीत काम करते. घेतलेले अन्न आवश्यक भाग शोषून घेऊन नको असलेला भाग टाकून देणे एवढा सगळा व्यापार शरीरच बघत असते. हे सर्व व्यापार बिघडवण्यास अन्नच कारणीभूत असते. पिण्याने माणूस म्हणजे कुळ होतो. नंतर प्यायल्याने स्थूल होतो. जेवणात मध्ये-मध्ये प्रमाणात घेतलेले पाणी अन्नसंघात मिसळून अमृतच ठरते.आहार घेत असतेवेळी सुद्धा आपले किती अन्न मागते . किती पचवू शकतो याचा थोडासा विचार करावा. आहाराचे जड असे प्रकार आपल्या सर्वांना माहीत आहेत. तुपात तळलेले, साखरेचे व हरभरा डाळी पदार्थ थोडे खाल्ले तरी पोट जड होईल. लाह्या कितीही खाल्ल्या तरीही काही वाटणार नाही. कमी प्रमाणात शरीरात अन्न गेल्यास कुपोषण होऊन प्रतिकार क्षमता कमी होईल. जास्त प्रमाणात सेवन केले तर मधुमेह, त्वचाविकार, स्थौल्य आदी संतर्पणजनित रोग होतील.म्हणून आहार हां सर्व गुण युक्त सात्विक असावा.
Nice
ReplyDelete